हेमंत लागवणकर यांनी दूरदर्शनच्या 'बालचित्रवाणी' या शैक्षणिक कार्यक्रमासाठी विज्ञानविषयक अनेक कार्यक्रमांचे पटकथा लेखन आणि सादरीकरण केले आहे. तसेच, विज्ञान प्रसार, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यातर्फे दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आलेल्या विज्ञानविषयक ६ मालिकांसाठी तज्ज्ञ समीक्षक म्हणून काम केले आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हेमंत लागवणकर यांनी संवाद साधला जेष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणेचे मुख्य मार्गदर्शक श्री. विवेक सावंत यांच्याशी. (कार्यक्रमाची संहिता वाचण्यासाठी क्लिक करा)