शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
English  |  मराठी 
 
     
  कृतियुक्त विज्ञान शिक्षण  
 

कृती, प्रयोग, उपक्रम, प्रकल्प ही विज्ञान शिक्षण प्रभावी होण्यासाठी वापरली जाणारी तंत्रे आहेत. विज्ञान शिक्षकांनी ही तंत्रे आत्मसात करुन प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात त्यांचा वापर करावा, यासाठी हेमंत लागवणकर यांनी विशेष प्रयत्न घेतले आहेत. कृतियुक्त विज्ञान शिक्षण वर्गात प्रत्यक्ष कसे करावे, हे समजावून देण्यासाठी त्यांनी विज्ञान शिक्षकांसाठी ७०० पेक्षा अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. याचा लाभ २५ हजारांपेक्षा जास्त विज्ञान शिक्षकांना मिळाला असून अनेक शिक्षक वर्ग अध्यापनात कृती, प्रयोग, उपक्रम यांचा समावेश करू लागले. (कृतियुक्त विज्ञान कार्यशाळांची यादी)

 
  विज्ञान अध्यापक मंडळे, प्रथम, काविश, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, रयत शिक्षण संस्था, खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई अशा अनेक शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन विज्ञान शिक्षकांसाठी हेमंत लागवणकर यांच्या कार्यशाळांचे आयोजन केले आहे. (पॉवर पॉइंट सादरीकरण : कृतियुक्त विज्ञान शिक्षण)  
 

कृतियुक्त विज्ञान शिक्षणाच्या एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या माहितीपत्रकासाठी येथे क्लिक करा

कृतियुक्त विज्ञान शिक्षणाच्या दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या माहितीपत्रकासाठी येथे क्लिक करा

 
 

शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेची ठळक वैशिष्ट्ये :

• ज्ञानरचनावाद आणि '5E' तंत्रावर आधारित.

• पूर्णपणे कृतियुक्त प्रशिक्षण आणि शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून सहभागी शिक्षकांचे सक्षमीकरण.

• प्रत्यक्ष वर्गात ज्ञानरचनावाद कसा आणता येतो, याचे विविध कृतींद्वारे थेट मार्गदर्शन.

• सहज उपलब्ध असलेल्या वस्तू वापरून शैक्षणिक साधने कशी तयार करावीत व वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन.

• कृती, प्रयोग, डिजिटल साहित्य यांचा प्रत्यक्ष वर्गअध्यापनात सुरेख मिलाप कसा करावा, याचे प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन.

 

 

 

 

 

 

 

 

कृतीप्रधान विज्ञान शिक्षणाचा डेमो लेसन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 
 
 
 
 

विविध ठिकाणची विज्ञान अध्यापक मंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे शिक्षण विभाग यांनी २०१८ - १९ व २०१९ - २० या वर्षांत हेमंत लागवणकर यांच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, उस्मानाबाद, ठाणे, हिंगोली, अकोला, नांदेड, नाशिक, अहमदनगर, यवतमाळ, बुलढाणा आणि अमरावती या १५ जिल्ह्यांमधून घेण्यात आलेल्या एकूण ४० एक दिवसीय कार्यशाळांना विज्ञान शिक्षकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळांचा लाभ ३८५० पेक्षा जास्त शिक्षकांनी घेतला. विज्ञान शिक्षकाने आपल्या वर्गात कृतीप्रधान विज्ञान अध्यापन पद्धती कशी राबवावी याचे मार्गदर्शन पाठ्यपुस्तकातील एक धडा प्रत्यक्ष तशा पद्धतीने शिकवून हेमंत लागवणकर यांनी या कार्यशाळांमधून केले.

(कार्यशाळांची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल)

 
 

विज्ञान प्रदर्शनांच्या दरम्यान कृतियुक्त विज्ञान शिक्षणाच्या कार्यशाळा

तालुका आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनांच्या निमित्ताने मोठ्या संख्येने विज्ञान शिक्षक एकत्रित येतात. या शिक्षकांसाठी हेमंत लागवणकर यांनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात कृतियुक्त विज्ञान शिक्षणाचे धडे देणाऱ्या ७ कार्यशाळा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि बीड या सहा जिल्ह्यांमधून घेतल्या. या कार्यशाळा प्रामुख्याने उच्च प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी होत्या. पाठ्यपुस्तकातील ठराविक घटकाची व्याप्ती इयत्तेनुसार कशी वाढत जाते, याचे प्रयोग आणि कृतींसह मार्गदर्शन या कार्यशाळांमधून करण्यात आले. सुमारे ४५० शिक्षकांनी या कार्यशाळांचा लाभ घेतला.

 
 

प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा

महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये पालघर जिल्ह्यातील माध्यमिक विज्ञान शिक्षकांसाठी हेमंत लागवणकर यांच्या कृतियुक्त विज्ञान प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले होते.

डहाणू, विक्रमगड, पालघर आणि वसई येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळांचा लाभ ४०० पेक्षा जास्त शिक्षकांनी घेतला. अशा प्रकारची कृतियुक्त कार्यशाळा आत्तापर्यंत आम्ही अनुभवली नव्हती, असे मत या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांनी व्यक्त केले.

प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात विद्यार्थ्यांच्या सहभागातून ज्ञानरचना कशी करावी, 'सुलभक' म्हणून शिक्षकाने वर्गात नेमके काय करावे, वर्गात एखादा घटक शिकविताना नेमक्या कोणत्या कृती घ्याव्यात, विद्यार्थ्यांच्या आकलनाचे मूल्यमापन कसे करावे अशा अनेक बाबींवर प्रत्यक्ष कृतींमधून हेमंत लागवणकर यांनी शिक्षकांना या कार्यशाळांमधून मार्गदर्शन केले.

(या कार्यशाळांमधील पॉवर पॉइंट सादरीकरण)

 
कार्यशाळेची छायाचित्रे - क्लिक करा
 
  जर तुमच्या संस्थेला अशा प्रकारची शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याची इच्छा असेल तर येथे क्लिक करून गुगल फॉर्म भरा.  
 

प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आयोजित रायगड जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी कार्यशाळा

महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी डिसेंबर २०१९ मध्ये रायगड जिल्ह्यातील उच्च प्राथमिक स्तरावर शिकविणाऱ्या विज्ञान शिक्षकांसाठी हेमंत लागवणकर यांच्या एकदिवसीय कृतियुक्त विज्ञान प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले होते.

महाड, म्हसाळा, खालापूर, कळंबोली आणि पोयनाड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळांमध्ये ६०० पेक्षा जास्त शिक्षक सहभागी झाले होते. अशा प्रकारची कृतियुक्त कार्यशाळा आत्तापर्यंत अनुभवली नव्हती आणि प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात या प्रशिक्षणाचा निश्चित उपयोग होईल, असे मत या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांनी व्यक्त केले.

प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात विद्यार्थ्यांच्या सहभागातून ज्ञानरचना कशी करावी, 'सुलभक' म्हणून शिक्षकाने वर्गात नेमके काय करावे, वर्गात एखादा घटक शिकविताना नेमक्या कोणत्या कृती घ्याव्यात, विद्यार्थ्यांच्या आकलनाचे मूल्यमापन कसे करावे अशा अनेक बाबींवर प्रत्यक्ष कृतींमधून हेमंत लागवणकर यांनी शिक्षकांना या कार्यशाळांमधून मार्गदर्शन केले.

(या कार्यशाळांमधील पॉवर पॉइंट सादरीकरण)

 
कार्यशाळेची छायाचित्रे - क्लिक करा