होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई यांच्यातर्फे हाती घेतलेल्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र राज्याच्या 'महाज्ञान' या मुक्त शिक्षण स्रोत (OER4S) प्रकल्पासाठी हेमंत लागवणकर यांनी २००९ ते २०११ या कालावधीत तज्ज्ञ मार्गदर्शक आणि समीक्षक म्हणून काम केले. (प्रकल्पासंदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)
२०११ साली हेमंत लागवणकर यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग या दूरस्थ शिक्षण देणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या 'डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन' या अभ्यासक्रमासाठी लेखक म्हणून काम केले.
२०१२ साली महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रम विकसन समितीमध्ये नेमणूक. या समितीच्या माध्यमातून इयत्ता ६वी ते ८वी चा विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रम विकसन प्रक्रियेत सहभाग.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान (RMSA) अंतर्गत शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांचेतर्फे माध्यमिक विज्ञान शिक्षकांसाठी मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित करण्यात आलेल्या शिक्षक हस्तपुस्तिकेत सह-लेखक म्हणून २०१४ साली सहभागी.
२०१६ साली महाराष्ट्र शासनातर्फे नेमण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या अभ्यासगटाचे सदस्य म्हणून हेमंत लागवणकर यांची नेमणूक झाली. या अभ्यासगटाच्या माध्यमातून इयत्ता ६वी ते १०वी चा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मिती यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
इस्रायल दूतावास, मुंबई यांचे शैक्षणिक उपक्रम
इस्रायल दूतावास, मुंबई, शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य आणि ऑब्झरर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १८ - १९ जून २०१४ रोजी बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे माध्यमिक विज्ञान शिक्षकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. (माहितीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, नवनिर्मितीची क्षमता, परस्परांच्या सहकार्याने शिकण्याचे कौशल्य या गुणांचा विकास करणे; तसेच प्रकल्प व कृतीप्रधान शिक्षण, आणि प्रत्यक्ष वर्गात ज्ञानरचनावाद निर्माण करणे हे या कार्यशाळेचे केंद्रविषय होते.
इस्रायल येथील डॉ. शहाफ गाल, डोव्ह किपरमन आणि ओजस वाल्डमान यांच्यासह हेमंत लागवणकर यांना या कार्यशाळेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. लागवणकर यांनी या कार्यशाळेत दोन सत्रे घेऊन वर्गामध्ये कृतीप्रधान विज्ञान शिक्षण कसे राबविता येईल हे विविध प्रयोग व कृतींच्या माध्यमातून स्पष्ट केले.
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा एक प्रमुख उपक्रम आहे. देशातील मुलांमध्ये विज्ञान संशोधन पद्धती रुजवणे आणि कृती संशोधन प्रकल्प प्रत्यक्ष करून त्याद्वारे विज्ञान शिकण्याची संधी मिळवून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. १९९३ सालापासून दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येतो आहे.
भारत सरकारच्या या देशव्यापी उपक्रमामध्ये सन २००० पासून हेमंत लागवणकर प्रकल्प परीक्षक मंडळाचे सदस्य आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. प्रकल्पाचे परीक्षण अधिक प्रभावी आणि पारदर्शकतेने व्हावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. २०१० - ११ आणि २०११ - १२ या वर्षी देण्यात आलेल्या 'माती : एक महत्वपूर्ण नैसर्गिक स्रोत' या केंद्रविषयासाठी मराठीमधून मार्गदर्शक पुस्तिका लेखनात सह-लेखक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या प्रसारासाठी आणि प्रकल्प मार्गदर्शन करण्यासाठी हेमंत लागवणकर यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून विज्ञान शिक्षकांसाठी २४ कार्यशाळा घेतल्या आहेत.
भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर २०१९ मध्ये कोलकता, पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या 'भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव २०१९' (IISF - 2019) मध्ये हेमंत लागवणकर यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. (माहिती पत्रक)
इयत्ता ६वी ते ८वी आणि इयत्ता ९वी - १०वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील संकल्पना, व्याख्या, सूत्रे, शास्त्रज्ञांविषयीची माहिती, प्रकल्पांची यादी इत्यादी बाबींचा समावेश असलेले हे तक्ते हेमंत लागवणकर यांनी तयार केले आहेत. विज्ञानाच्या उजळणीसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हे तक्ते उपयुक्त आहेत.