English  |  मराठी 
 
     
  पुरस्कार आणि सन्मान  
     
 

भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यातर्फे २०१३ सालचा विज्ञान प्रसारासाठी देण्यात येणारा देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त. हा पुरस्कार पुस्तके, विविध वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिके यांसारख्या मुद्रित माध्यमांतून केलेल्या विज्ञान प्रसाराच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल देण्यात आला.

हा पुरस्कार २८ फेब्रुवारी २०१४ या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात डॉ. के. विजयराघवन यांच्या हस्ते भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे तत्कालिन सचिव डॉ. टी. रामसामी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

(८ मार्च २०१४ रोजी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रामधून प्रसिद्ध झालेला लेख)

 
 
     
 
  कल्याण - डोंबिवली महानगरपालिका आणि आरोहन यांच्यातर्फे १ मार्च २०११ रोजी राष्ट्रीय स्तरावर विज्ञान प्रसाराच्या योगदानाबद्दल माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित.
 
     
 

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल देण्यात येणारा 'मनोरमाबाई आपटे पुरस्कार' अंटार्क्टिका येथे जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला सागरवैज्ञानिक डॉ. अदिती पंत यांच्या हस्ते २९ एप्रिल २०१२ रोजी प्राप्त.

हा पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान प्रसाराचे भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला दर तीन वर्षांतून एकदा देण्यात येतो.

 
 
     
 
 

एप्रिल २०१२ मध्ये श्री. रविंद्र चव्हाण, आमदार, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते 'आदर्श डोंबिवलीकर' पुरस्काराने सन्मानित. प्रमुख उपस्थिती - श्री. सुधीर जोगळेकर.

 
     
 

विज्ञान प्रसाराच्या कार्यात राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या योगदानाबद्दल केळकर एज्युकेशन ट्रस्टचे वि. ग. वझे महाविद्यालय, मुलुंड यांच्यातर्फे २०१७ - १८ सालचा Alumni Achievers' Award हा पुरस्कार देऊन सन्मानित.

हा पुरस्कार ३० जानेवारी २०१८ रोजी डॉ. राजपाल हांडे, प्राचार्य मिठीबाई कॉलेज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 
 
 
             
 
 
 
राष्ट्रीय पुरस्कार   मनोरमाबाई आपटे पुरस्कार   रोटरी एक्सलन्स पुरस्कार   माजी विद्यार्थी गौरव पुरस्कार
भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या तर्फे   मराठी विज्ञान परिषद यांचे तर्फे   रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी तर्फे   वि. ग. वझे महाविद्यालय, मुलुंड तर्फे
(२८ फेब्रुवारी २०१४)   (२९ एप्रिल २०१२)   (१९ एप्रिल २०१४)   (३० जानेवारी २०१८)