English  |  मराठी 
 
     
  अल्पपरिचय  
  हेमंत लागवणकर  
  (M.Sc., B.Ed.)
(विज्ञान प्रसारक आणि शैक्षणिक सल्लागार)
 
     
  • विज्ञानविषयक ४० पुस्तकांचे लेखन.  
  • मा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या उत्तम पुस्तकांच्या यादीत ५ पुस्तकांचा समावेश.
 
  • विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांमधून १००० पेक्षा अधिक विज्ञानविषयक लेख प्रकाशित.  
  • २०१२ पासून महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रम विकसन मंडळाच्या विज्ञान विषयगटाचे सदस्य.  
  • २०२० पासून रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, लंडन यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या विज्ञान शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून नियुक्त.  
  • राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील सुमारे १४ हजार माध्यमिक विज्ञान शिक्षकांना २०१५ - १६ आणि २०१७ - १८ या वर्षांत महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्ती.  
  • महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळात लेखक आणि तज्ज्ञ समीक्षक म्हणून सहभाग.  
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) या जगातल्या सर्वात मोठ्या दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या 'डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन' या अभ्यासक्रमाच्या लेखक मंडळात सहभाग.  
  • २०१२ ते २०२१ या कालावधीत मराठी विज्ञान परिषदेच्या 'पत्रिका' या विज्ञानविषयक मासिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य.  
  • आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या २५० पेक्षा अधिक विज्ञानविषयक कार्यक्रमांमध्ये १९८९ सालापासून लेखन, निर्मिती आणि निवेदन यांमध्ये सहभाग.  
  • दूरदर्शनच्या 'बालचित्रवाणी' या शैक्षणिक कार्यक्रमासाठी विज्ञानविषयक अनेक कार्यक्रमांचे पटकथा लेखन आणि सादरीकरणामध्ये सहभाग. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरील विज्ञानविषयक ६ मालिकांसाठी तज्ज्ञ समीक्षक म्हणून कार्य.  
  • विज्ञानविषयक २४ ऑडियो-व्हिज्युअल मल्टीमिडिया सीडींसाठी लेखन.  
  • भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत २००० सालापासून राष्ट्रीय स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक व परीक्षक म्हणून कार्यरत.  
  • कृतीप्रधान विज्ञान शिक्षण, विज्ञान शिक्षणातील ज्ञानरचनावाद, विज्ञान प्रकल्प यांसारख्या विषयांवर १२५ पेक्षा अधिक भाषणे आणि ७०० पेक्षा अधिक शिक्षक प्रशिक्षणांमधून तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग.  
     
  सन्मान आणि पुरस्कार :  
  • भारत सरकारतर्फे विज्ञान प्रसाराच्या कार्यासाठी देण्यात येणारा देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार (२०१३ सालचा) २८ फेब्रुवारी २०१४ रोजी प्राप्त.  
  • विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल २०११ साली डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित.  
  • विविध माध्यमांतून केलेल्या विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेचा २०१२ सालचा मनोरमाबाई आपटे पुरस्कार प्राप्त.  
  • विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल २०१२ साली 'आदर्श डोंबिवलीकर' पुरस्काराने सन्मानित.  
  • २०१४ साली रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी तर्फे 'रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड' ने सन्मानित.  
  • राष्ट्रीय स्तरावर केलेल्या विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल वि. ग. वझे महाविद्यालय, मुलुंड यांच्यातर्फे २०१७ - १८ च्या माजी विद्यार्थी गौरव पुरस्काराने सन्मानित.